Type Here to Get Search Results !

७ वर्षीय मुलीला खाऊचे आमिष दाखवून केला अत्याचार!



अहमदनगर: अहमदनगर शहरात घराच्या अंगणात खेळणाऱ्या ७ वर्षीय मुलीला पाणीपुरी, चॉकलेट, चिप्सचे आमिष दाखवून तिच्यावर तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला आहे. पीडित मुलीच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपी युसूफ हमीद कुरेशी (वय ३४) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, ७ वर्षीय मुलीची आई मोलमजुरीचे काम करते. या मुलीला तीन ते चार दिवसांपासून युसूफ कुरेशी हा पाणीपुरी, चॉकलेट, चिप्स देत होता. गणेश चतुर्थीनिमित्त शाळेला सुट्टी असल्याने त्याची मुलगी घरीच होती. मुलीची आई कामावर गेल्यावर युसूफने मुलीला दुचाकीवरून घेऊन मंगलकार्यालयात घेऊन गेला. त्यानंतर युसूफने मुलीवर अत्याचार केला. 



दरम्यान, सदर प्रकरणाची माहिती मिळताच  संस्थेच्या स्वयंसेकांच्या मदतीने पीडित मुलीच्या आईने पोलिसात धाव घेतली. त्यानंतर पोलिसात धाव घेऊन युसूफ कुरेशी विरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच युसूफ कुरेशीला पोलिसांनी अटक केली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies