Type Here to Get Search Results !

“सरकारच्या भरवश्यावर राहू नका, मी सरकारमध्ये आहे म्हणून....." 'यांचे' मोठे वक्तव्य!



नागपूर : माझं मार्केट मी शोधलं आहे, तुमचं मार्केट तुम्ही शोधा, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  यांनी भाजीपाला व फळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिला आहे. तसेच, शेतकऱ्यांनी सरकारवर फारसं अवलंबून राहू नये, मी स्वतः सरकारमध्ये आहे म्हणून तुम्हाला सांगतोय असा सल्ला यावेळी गडकरी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.  



तसेच ते पुढे म्हणाले, "सरकारच्या फार भरवश्यावर राहू नका, मी सरकारमध्ये आहे म्हणून सांगतो. कृषी क्षेत्रात विकास करायचा असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे. सरकारच्या भरवश्यावर न राहता स्वतः कृती करायला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी प्रगती केली आहे, अशा शेतकऱ्यांचा आदर्श घ्या", असा सल्ला नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना यावेळी दिला.



दरम्यान, नागपुरात अॅग्रो व्हिजन फाउंडेशनच्या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. विदर्भातील फळ आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी संधी या विषयावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies