Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, शनिवार ३ सप्टेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!मेष :

मुलांकडून शुभ वार्ता मिळतील.जुन्या कामांमधून यश मिळेल. दिवसाच्या पूर्वार्धात रखडलेली कामे मार्गी लागतील. घरात धार्मिक कार्य घडेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. वृषभ:

शासनाकडून लाभाची शक्यता. अपेक्षित उत्तर मिळेल. नवीन ओळखीतून लाभ होईल. अप्रिय व्यक्तीची भेट घडू शकते. सामाजिक मुद्यात लक्ष घालू नका.  मिथुन:

मन काहीसे विचलीत राहील.  मुलांची प्रगती पाहून मन खुश होईल. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. कर्क:

जवळचे मित्र भेटतील. अति विचार करू नका. महत्त्वाची कामे आज टाळावीत. कौटुंबिक जबाबदारी सांभाळावी लागेल. मानसिक चंचलता राहील.सिंह:

कामाची धावपळ वाढेल. अति कामामुळे थकवा जाणवेल. बोलण्यातील माधुर्यामुळे मान मिळवाल. व्यापारीवर्ग खुश राहील. प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल.कन्या:

व्यापारी क्षेत्रातील प्रयत्न फळाला येतील. तुमच्या पराक्रमात वाढ होईल. मन प्रसन्न राहील. चांगल्या गोष्टीसाठी पैसे खर्च होतील. रखडलेली कामे पूर्ण करा.तूळ:

प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस. योग्य शहानिशा करावी. कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील. आनंदाची अनुभूति घ्याल. धनलाभाचे उत्तम योग आहेत. वृश्चिक:

नवीन खरेदी कराल. अति विचारात वेळ वाया घालवू नका. विद्यार्थ्यांनी अति घाई करू नये. गुंतवणुकी संदर्भात नवीन गोष्टी जाणून घ्याल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.धनू:

जुने काम मार्गी लावण्याची संधी मिळेल. कामात तुमचा उत्तम प्रभाव पडेल. सासरच्या मंडळीकडून धनलाभाचे योग आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. मानसिक शांतता लाभेल.मकर:

भावनात्मकता टाळावी. जोडीदाराच्या कलाने काम करा. मिळकतीच्या बाबतीतील प्रयत्न यशस्वी होताना दिसतील. धार्मिक कामाची आवड वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.कुंभ:

नियोजना अभावी कामे रेंगाळू शकतात. खेळ व कलेमध्ये रमाल. अति भावुक होऊ नका. पराक्रमाला चांगला वाव आहे. जोडीदाराचे म्हणणे टाळू नका.  मीन:

बोलण्याच्या भरात शब्द देऊ नका. कामात अधिक स्फूर्ति येईल. मुलांसोबत दिवस खेळीमेळीत जाईल. उधारीचे व्यवहार करू नका. आरोग्यात सुधारणा होईल.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies