Type Here to Get Search Results !

आज राज ठाकरे घेणार मुख्यमंत्री शिंदेंची भेट!



मुंबई :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. राज ठाकरे हे सहकुटुंब मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाणार आहे. आज संध्याकाळी साडे सहा वाजता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतील. यानंतर वर्षा बंगल्यावरील बाप्पाचं दर्शन सुद्धा घेणार आहे. 



दरम्यान, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सहकुटुंबासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांमधील भेटीगाठी वाढत असल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies