Type Here to Get Search Results !

'वेदांता' प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा मोदींना फोन; मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली ‘हि’ विनंती!



मुंबई: महाराष्ट्रात दोन लाख कोटींची गुंतवणूक असणारा आणि दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा महत्वपूर्ण 'वेदांता' ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने राज्यातील राजकारण जोरदार तापले आहे.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी रात्री फोन करत वेदांता उद्योग प्रकल्प आणि गुंतवणुकीबाबत सहकार्य करा असी विनंती केली असल्याची माहिती समोर आली आहे.



माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी पंतप्रधान मोदींना फोन करत वेदांचा उद्योग प्रकल्प आणि गुंतवणुकीबाबत सहकार्य करण्याची विनंती केली आहे. शिवाय महाराष्ट्रातील परदेशी गुंतवणुकीबाबत सहकार्य करण्याची विनंती देखील मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. 



त्यामुळे आता गुजरातला गेलेला प्रोजेक्ट राज्यात परतणार का मुख्यमंत्र्यांचा फोन काम करणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies