Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्याने गायले चंद्रा या गाण्याचे मेल व्हर्जन:एकदाच ऐका ‘हे’ भन्नाट गाण!मुंबई : चंद्रमुखी सिनेमातील चंद्रा या गाण्याने सर्वानांच वेड लावले आहे. आजवर या गाण्यावर अनेकांनी ठेका धरला याचे व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. मात्र, एका लहान मुलाने हे संपूर्ण गाणंच गायले आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. या मुलाने चंद्रा गाणं इतके भारी गायलयं की व्हिडिओ एकदा पाहिल्यावर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहतचं रहावसं वाटत आहे.जिल्हा परिषद शाळेचा हा विद्यार्थी आहे. त्याच्या शाळेतील शिक्षकाने त्याचा हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. मुलाचे टॅलेंट पाहून सरांनी हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. एखाद्या प्रख्यात गायका प्रमाणे अतिशय अप्रतिम असे हे गाण या विद्यार्थ्याने गायले आहे. या निमित्ताने चंद्रा या गाण्याचे मेल व्हर्जन ऐकायला मिळाले आहे. जयेश खरे असे हे गाण गाणाऱ्या मुलाचे नाव आहे.कृष्णा राठोड या शिक्षकाने हा व्हिडिओ त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, करजगाव या शाळेत बदली झाल्यानंतर इयत्ता सहावीच्या वर्गावर गेलो.विद्यार्थ्यांची ओळख झाल्यानंतर त्यांच्यातील विशेष गुणांची तपासणी करत असताना जयेश खरे नावाच्या विद्यार्थ्यांनी एक अप्रतिम गाणं सादर केले..गाणं ऐकल्यानंतर पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचं एक वाक्य आठवलं या मातीमध्ये अनेक प्रकारची रत्ने तुम्हाला सापडतील फक्त ती माती ढवळण्याची गरज आहे असं कॅप्शन या शिक्षकाने दिले आहे.
Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies