Type Here to Get Search Results !

महिला पत्रकाराचा हिजाब घालण्यास नकार दिल्याने इराणच्या राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी...!



नवी दिल्ली:  अमेरिकेतील एका महिला पत्रकाराने हिजाब न घातल्यामुळे तिला मुलाखत देण्यास इराणच्या राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी नकार दिला  आहे.



माहितीनुसार, इब्राहिम रईसी यांची मुलाखत एका अमेरिकन महिला न्यूज अँकर घेणार होती. मात्र, या मुलाखती आधी तिला हिजाब घालण्यास सांगण्यात आले. यावेळी या महिला पत्रकाराने त्याला विरोध केला. त्यामुळे नियोजित मुलाखतीसाठी ती आली तरी केवळ हिजाब न घातल्यामुळे तिला मुलाखत देणं रईसी यांनी टाळलं.



दरम्यान, इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या या कृतीमुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शिवाय या प्रकरणानंतर महिला पत्रकाराने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मला हेडस्कार्फ घालण्यास सांगितले होते, परंतु मी तसे करण्यास नकार दिला. यानंतर ही मुलाखत अचानक रद्द करण्यात आली. ४० मिनिटे इराणच्या राष्ट्राध्यक्षांची वाट पाहत होते. मात्र, ते आले नाहीत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies