मुंबई: गोरेगावच्या नेस्को सभागृहामध्ये आज शिवसेनेच्या वतीने गटप्रमुखांचा भव्य मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. राज्यातील सत्तासंघर्षानंतर आणि मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच जाहीर सभेमध्ये बोलत होते.
भाषणाला सुरुवात करतानाच उद्धव ठाकरेंनी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो आणि भगिनींनो म्हणत सुरुवात केली. शिवाय यावेळी त्यांनी यंदाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार असल्याची घोषणा देखील केली.