Type Here to Get Search Results !

बीड: धमकी देत मित्रानेच केला मित्राच्या बायकोवर बलात्कार !



बीड: बीडच्या धारूर तालुक्यातील एका गावात फेसबुकवर फोटो टाकण्याची धमकी देत, एका नराधम मित्राने आपल्याच मित्राच्या बायकोवर बलात्कार केला आहे.याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सचिन सीताराम वाव्हळ असे आरोपीचे नाव आहे.



माहितीनुसार,  12 सप्टेंबर रोजी तालुक्यातील असोला येथील रस्त्याने जात असताना, पतीचा मित्र आरोपी सचिन वाव्हळ हा गाडी घेऊन आला. तुम्हाला सोडवून देतो असं म्हणत आरोपीने पीडितेला जबरदस्तीने गाडीत बसवलं.



त्यानंतर आरोपीने पीडितेला बांगरवाडी परिसरात नेलं. पीडितेच्या गळ्यात हात टाकून आरोपीने फोटो देखील काढले. फोटो फेसबुकवर व्हायरल करतो, असे म्हणत आरोपीने पीडितेवर जबदस्तीने अत्याचार केला. या सर्व प्रकारानंतर घडलेली सर्व हकीकत पीडितेने आपल्या पतीला सांगितली. मित्रानेच घात केल्याचं लक्षात येताच पीडितेच्या पतीने पोलिसांत धाव घेतली.




दरम्यान पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी सचिन वाव्हळ याच्यावर धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies