Type Here to Get Search Results !

इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक'चे शिक्षण मराठीत करणार: उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील!



पुणे: ३१ डिसेंबरपर्यंत सर्व पुस्तके मराठीमध्ये करणार, तसेच इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक'ची पुस्तके देखील मराठीमध्ये करणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज पुण्यात दिली. ते आज सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र या कार्यक्रमात बोलत होते. 



यावेळी बोलताना पाटील म्हणाले, राज्यात सर्व पुस्तके मराठीमध्ये करणार असून आता इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक'ची पुस्तके देखील मराठीत उपलब्ध होणार आहेत. तसेच,  NSS मधील मुलांची संख्या देखील ५ लाखांपर्यंत नेणार असल्याचे पाटील यांनी सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र या कार्यक्रमात सांगितले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies