Type Here to Get Search Results !

सोलापूर: पाण्याच्या टाकीवरुन वाद करत मुलानेच बापाच घेतला जीव!



सोलापूर: सोलापूरात पाण्याची टाकी देण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या मुलाने जन्मदात्या पित्याला बेल्टने मारहाण केली, या मारहाणीत ९२ वर्षीय वडिलांचा मृत्यू झाला. दगडू कोकणे असे मयत वडिलांचे नाव आहे.या प्रकरणी मुलगा शेकुंबर दगडू कोकणे आणि सुजाता शेकुंबर कोकणे या दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, दगडू हे पत्नीसोबत गांधीनगर झोपडपट्टीत राहत होते. तेथे दहा बाय दहाची त्यांची रूम होती. त्या रूमवरून आरोपी शेकुंबर आणि त्याची पत्नी नेहमी दोघांना त्रास देत होते. आरोपींनी दगडू यांच्याकडे येऊन पिण्याच्या पाण्याच्या टाकीची मागणी केली. त्यानंतर वडील दगडू आणि आई सुंदराबाई यांनी टाकी देण्यास नकार दिल्याने आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. शेकुंबर याने कंबरपट्ट्याने दगडू यांना मारहाण केली तर आरोपी सुजाताने सुंदराबाई यांचा गळा दाबला. त्यांना या दोघांच्या तावडीतून त्यांच्या ओळखीतील इसमाने एमआयडीसी पोलीस ठाणे येथे आणले. त्यानंतर ही घटना दगडू आणि सुंदराबाई यांनी दत्तकपुत्र मालू यांना सांगितली.यावेळी दगडू यांची स्थिती चिंताजनक होती.



दरम्यान,  छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशीरा डॉक्टरांनी दगडू यांना मयत घोषित केले. याप्रकरणी दोन्ही आरोपींना रात्री उशीरा अटक करण्यात आली. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies