Type Here to Get Search Results !

“मंत्री सामंत यांना जाळून मारु”: ‘यांनी’ उदय सामंत यांची मागितली माफी!



मुंबई: . मंत्री सामंत यांना जाळून मारु असे वक्तव्य जोशी यांनी रविवारी केले होते. त्यानंतर त्यांची पाेलिस चाैकशी व्हावी अशी मागणी सामंत समर्थकांनी केली हाेती.या पार्श्वभूमीवर, एक व्हिडीओ शेअर करत  बारसू रिफायनरी सोलगव समितीचे सरचिटणीस नरेंद्र जोशी यांनी मंत्री उदय सामंत यांची माफी मागितली. 



ते म्हणाले, काल (रविवार) गोवळ येथे काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आले होते. त्यावेळी सभे दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबाबत माझ्याकडुन जे काही वक्तव्य झाले त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या भावना सरकार पर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे रागातून ते शब्द बाहेर पडले. माझा त्यांना दुखावण्याचा कोणताच प्रयत्न नव्हता,असे त्यांनी नरेंद्र जोशी यांनी व्हिडीओ शेअर करत उदय सामंत यांची माफी मागितली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies