मुंबई: राज्यात दोन लाख कोटींची गुंतवणूक असणारा आणि दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा हा महत्वपूर्ण 'वेदांता' ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात येणार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या,'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, यापेक्षा मोठा प्रकल्प राज्यासाठी देऊ. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, तुमचं मुख्यमंत्रिपद काही काळ अजित पवारांना द्या, आम्ही तुम्हाला त्यापेक्षा मोठं पद देऊ. चालेल का ?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे .
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात एका कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.