Type Here to Get Search Results !

आजचे दिनविशेष; जाणून घ्या इतिहासातील महत्वाच्या घटना!आटपाडी: सप्टेंबर महिन्यात गणपतीचे आगमन झाले आहे. घरोघरी गणपती विराजमान झाले आहेत. तसेच पितृपक्ष पंधरवडा सुद्धा याच महिन्यात येतो. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. जागतिक नारळ दिन 

नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हटले जाते. नारळापासून निर्माण होणाऱ्या सगळ्याच गोष्टी या मनुष्याला उपयोगी पडतात. नारळाचा उपयोग खाण्यासाठी, औषधांसाठी, तेलासाठी तसेच इतर अनेक गोष्टींसाठी केला जातो. नारळाच्या लागवडीपासून जगातल्या अनेक देशांत चांगला रोजगार मिळत आहे. त्यामुळे नारळाचे महत्व आणि त्याचा वापर याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 2 सप्टेंबर हा दिवस जागतिक नारळ दिन म्हणून साजरा केला जातो.1999 : भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोनदा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.

सन 1970 साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आपले अपोलो हे चंद्र मिशन काही कारणास्तव रद्द केले.

1573 : अकबराने अहमदाबादजवळ निर्णायक युद्ध जिंकले आणि गुजरात ताब्यात घेतला. या विजयाच्या आनंदात बुलंद दरवाजा बांधण्यात आला.

1945 : सहा वर्ष चाललेले दुसरे महायुद्ध जपानने पराभव स्वीकारल्यानंतर संपले.

1946 : जवाहरलाल नेहरू यांच्या उपअध्यक्षतेखाली भारताच्या अंतरिम सरकारची स्थापना.

1969 : पहिले ऑटोमॅटिक टेलर मशीन  न्यूयॉर्क, यूएसए येथे जगासमोर आणले गेले.

सन 1976 साली प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे प्रथम महाराष्ट्रीयन मराठी लेखक, कादंबरीकार वि. स. खांडेकर यांचे निधन.

वि. स. खांडेकर हे मराठी कादंबरीकार, लेखक होते. वि.स. खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगलीत झाला. त्यांच्या पूर्वायुष्यात, त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. वि.स.खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंतःकरणात समाजकल्याणाची आणि प्रगतीची तळमळ आहे. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा आणि समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. 'ययाति' या कादंबरीसाठी त्यांना 1960 साली साहित्य अकादमी पुरस्काराने तर,1974 साली ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies