Type Here to Get Search Results !

“बाळासाहेबांचे स्मारक बांधण्याचं सोडून हे याकूब मेमनची कबर...…”: ‘यांची’ उद्धव ठाकरेंवर टीका



मुंबई :याकुब मेमनच्या कबरीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर भाजपचे नेते नितेश राणे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. पण ही प्रतिक्रिया देताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा मुद्दा पुढे करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.



राणे म्हणाले, "दोन वर्षे मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांचे स्मारक बांधण्याचं सोडून हे याकूब मेमनची कबर सजवत बसले", असे नितेश राणे म्हणाले आहेत. 


तसेच ते म्हणाले, बाळासाहेबांचं स्मारक केलं नाही अन् आता म्हणतात, माझ्या बापाच्या नावाने मतं मागू नका, असं म्हणत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies