Type Here to Get Search Results !

“....म्हणून दिल्ली दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांसोबत भाजपचा एकही नेता नाही”!



नवी दिल्ली:  महाराष्ट्रातून वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शिंदे गटामध्ये अस्वस्थता आहे. त्यातच महाराष्ट्राचे ३ लाख कोटीपेक्षा जास्त किंमतीचे प्रकल्प केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पडून आहेत. आता या प्रकल्पाला मंजूरी मिळावी म्हणून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्र्यांना घेऊन दिल्ली दौऱ्यावर येत आहे. परंतु, याआधी एकनाथ शिंदे यांनी जेव्हा जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत होते.मात्र,या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत भाजपचा एकही मंत्री नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत.



दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपल्याच गटातील उद्योग मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे सोबत असणार आहे. त्यामुळं शिंदे आणि भाजपमध्ये सर्व काही आलबेल आहे का? असा सवालही या निमित्ताने उपस्थित होतो.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies