Type Here to Get Search Results !

बारामती मतदारसंघ जिंकण्याची आखली रणनीती: देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य!



बारामती: भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 'मिशन ४५' अंतर्गत जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघाताही राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करण्याची रणनीती आखली आहे. भाजपच्या या रणनीतीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले आहे.



भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट एकत्र लढणार असून बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्याची रणनीती आखली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत जिंकण्याचा निर्धार पक्का केला आहे. 'भाजपचे मिशन इंडिया आहे. भाजपचे मिशन महाराष्ट्रात आहे. बारामती महाराष्ट्रात येते, त्यामुळे मिशन महाराष्ट्रात बारामती आहे. आमच्यासाठी प्रत्येक सीट महत्वाची आहे', असे भाष्य देवेंद्र फडणवीस यानी केले.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies