Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, रविवार ४ सप्टेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:

खर्चावर नियंत्रण ठेवा. घरातील टापटिपित मन रमून जाईल. आजचा दिवस चांगला जाईल. चांगले वाहन सौख्य लाभेल. नातेवाईकांकडून विचित्र अनुभव येऊ शकतो.



वृषभ:

हाती घेतलेली सर्व कामे पूर्ण होतील. लहान प्रवास घडू शकेल. व्यवसायातील योजना लाभदायक ठरतील. मित्रांच्या मदतीने एखादे जुने काम पूर्ण होईल. हातातील कलेतून आनंद मिळेल.



मिथुन:

जवळचे मित्र बऱ्याच दिवसांनी भेटतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. बोलण्यातून सर्वांना आपलेसे कराल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील. 



कर्क :

दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवाल. स्वत:चे खरे करण्याकडे कल राहील. नवीन ओळखीचे मैत्रीत रूपांतर होईल. भावनेला आवर घालावी लागेल. आजचा दिवस लाभदायक ठरेल.



सिंह:

वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. मनात काहीशी चलबिचलता राहील. निराश होणे टाळावे. एकदा पुढे टाकलेले पाऊल मागे घेऊ नका.  


 

कन्या:

बुद्धीवर्धक कामे हाताळाल.  आज मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. त्यामुळे बौद्धिक ताण जाणवू शकतो. अपेक्षित लाभाने आपण खुश राहाल. कामात स्त्रीवर्गाचा चांगला हातभार लागेल. 


तूळ:

जोडीदाराचा वरचष्मा राहील. घरातील कामात अधिक वेळ जाईल. केलेल्या कामातून कौतुकास पात्र व्हाल. अधिकारी वर्गाचा वेळोवेळी सल्ला घ्यावा. महत्त्वाच्या नोंदी करून ठेवाव्यात. 



वृश्चिक:

मित्रांच्या ओळखीने काम होईल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. विशाल दृष्टीकोन ठेवून आपले मत मांडाल. तरुण वर्गाची कामात मदत मिळेल. आध्यात्मिक आवड पूर्ण कराल.



धनू:

कमिशनच्या कामातून आर्थिक गरज भागवली जाईल.  अचानक धनलाभ होण्याची शक्यता. रागावर नियंत्रण ठेवा. शेअर्स, जुगार यातून अपेक्षित लाभ मिळू शकेल. वडीलधार्यांहचा आशीर्वाद मिळवाल.


 

मकर:

भागिदारीतून चांगला नफा मिळेल.  जोडीदाराच्या प्रेमळ स्वभावाचा पुन:प्रत्यय येईल. संपर्कातील व्यक्तींशी मैत्री वाढेल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. 



कुंभ:

जोडीदाराच्या कुशलतेचे कौतुक कराल. आपल्या हातातील अधिकार लक्षात घ्यावेत. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल.  कोणतेही साहस करतांना सावध राहावे. केलेल्या कामाचा आनंद मिळेल. 



मीन:

दिवस मनासारखा घालवाल. प्रेमात असलेल्या व्यक्तींना आज मनातील बोलता येईल. खेळकरपणे समोरील गोष्टी हाताळाल.अति भावनाशील होऊ नका. जुगारातून अपेक्षित कमाई कराल. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies