मुंबई: प्रत्येकच पक्षाला ऊन-सावली असते. गोपीनाथ मुंडे यांचे संपूर्ण आयुष्य भाजपामध्ये गेले आहे, पंकजा मुंडे यांनी देखील पक्षासाठी मेहनत घेतली आहे, त्यामुळे त्या भाजपा सोडून दुसऱ्या पक्षात जाणार नाहीत" असे जानकर यांनी वक्तव्य केले आहे.
तसेच ते पुढे म्हणाले, रासपने कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी यापूर्वीच केली आहे व तसा प्रस्ताव देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात पंकजा मुंडे यांना स्थान न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाले.अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे. याच वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी यावर भाष्य केले आहे.