Type Here to Get Search Results !

“मुंबई सारख्या शहरात महिला खेळाडू साठी शौचालयाची सोय नाही” ‘यांचे’ मोठे वक्तव्य!



मुंबई : अनुराग ठाकूर हे सध्या दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. अनुराग ठाकूर यांनी मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले. आज त्यांनी दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 



यावेळी ठाकूर म्हणाले, मुंबई महापालिकेकडे सर्वाधिक कर संकलन आणि बजेट प्रणाली आहे. तरीही इतक्या मोठ्या शहरात शौचालयाची सोय नसल्याने महिला आणि वृध्द नागरिकांना परिणाम भोगावे लागतात, ही दुर्दैवाची बाब आहे. महानगरपालिकेने खेळाकडे आणि महिला खेळाडूंकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. आम्ही शहराचे सौंदर्यीकरण आणि खेळांना प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रीत करू, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. 



दरम्यान, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies