Type Here to Get Search Results !

पत्रा चाळ प्रकरणात शरद पवारांवरील आरोपांवर सुप्रिया सुळेंची मोठी प्रतिक्रिया!



मुंबई: पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची चौकशी करण्यात यावी अ सेपत्र त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवले आहे. या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


'ईडीचे कागदपत्रे लीक होत आहेत का ? असे असेल तर देशासाठी ही फार गंभीर बाब आहे. त्यामुळे मी या संदर्भातील देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी भेट घेऊन याबद्दल चर्चा करणार आहे. मला देशाची चिंता आहे'. जे आरोप करत आहेत, त्यांच्याकडे या संदर्भात काही कागदपत्रं आहेत का ? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांवर करण्यात आलेल्या आरोपांवर केला आहे.



दरम्यान, खासदार सु्प्रिया सुळे यांनी किन्नर माँ एक सामाजिक संस्था ट्रस्ट आयोजित कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमानंतर खासदार सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies