Type Here to Get Search Results !

जमिनीच्या वादातून लहान भावानेच दादा-वहिनीची केली हत्या!

 


चंद्रपूर : चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील गायडोंगरी येथे मोठ्या भावासोबत जमिनीसाठी झालेल्या वादातून लहान भावाने मोठ्या भावासह वहिनीची हत्या केलीआहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, जमिनीसाठी झालेल्या वादातून लहान भावाने दादा-वहिनीची हत्या केली आहे. सावली तालुक्यातील मनोहर गुरुनुले (६२) शारदा मनोहर गुरुनुले (५०) लहान भाऊ धनराज गुरुनुले (५२) यांच्या सतत वाद व्हायचा. यातून आज, सोमवारी मोठ्या व लहान भावामध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणात लहान भाऊ धनराज गुरुनुले याने मोठा भाऊ मनोहर व वहिनी शारदा यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात मनोहर गुरुनुले हे जागीच ठार झाले. तर शारदा गुरुनुले यांना जखमी अवस्थेत प्रथम सावलीनंतर गडचिरोलीमधील जिल्हा सामान्य रुग्णालायात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्याही उपचारादरम्यान मृत्यू झाला.



दारामाय्न, सदर घटनेची माहिती पाथरी पोलिसांना मिळताच ठाणेदार मंगेश मोहड हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले व आरोपी धनराज गुरुनुले याला ताब्यात घेत त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies