Type Here to Get Search Results !

फ्लॅट विक्रीच्या वादातून पतीनेच पत्नीचा केला खून!नवी दिल्ली: मंगळवारी दिल्लीतील लक्ष्मीनगर येथे फ्लॅटची विक्री करण्यावरुन पती-पत्नीमध्ये झालेल्या वादात पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला. पत्नीची हत्या करुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी पतीचे नाव नीरज असे आहे.याबद्दल अधिक माहिती अशी कि,  दिल्लीतील लक्ष्मीनगर येथे राहत असणाऱ्या नीरज नावाच्या व्यक्तीचा त्याच्या पत्नीसोबत फ्लॅट विकण्याच्या कारणावरुन सतत वाद व्हायचा. सदर फ्लॅट हा नीरजच्या पत्नीच्या नावावरती होता आणि तिला तो फ्लॅट विकायचा होता. मात्र, पती नीरजला फ्लॅट विकायचा नव्हता, दोघांमधील या मतभेदांमुळे मंगळवारी रात्री मोठा वाद झाला आणि याच वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. पती नीरजने आपल्या पत्नीला चाकूने भोसकलं.या भांडणादरम्यान घरात असणाऱ्या ८ आणि १२ वर्षाच्या दोन मुलांनी आईला वाचविण्याचा प्रयत्न केला असता नीरजने त्यांना देखील मारहाण केली. शिवाय या सर्व घटनेनंतर त्याने स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. हा सर्व वाद सुरु असताना शेजारी राहत असणाऱ्या लोकांनी पोलिसांना कळवले.दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना कळताच ते तत्काळ घटनास्थळी आले आणि जखमींना रुग्णालयात हालवले. मात्र, रुग्णालयात पोहताच डॉक्टरांनी पत्नीला मृत घोषित केले. तर पती नीरजसह दोन्ही मुलांवरती सध्या उपचार सुरु आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies