Type Here to Get Search Results !

राज्यात लम्पी चर्म रोगाच्या संसर्गात वाढ; पशुसंवर्धन आयुक्तानी सांगितला ‘हा’ खबरदारीचा उपाय!



पुणे: राज्यात लम्पी चर्म रोगाचा फैलाव वाढला आहे. याबाबत शासनाकडून जागरुकता करण्यात येत आहे. आज, मंगळवारी पुण्यात पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लम्पी आजाराशी संबंधीत शासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली आहे.


लंम्पी चर्म रोगाने आजपर्यंत २६६४ जनावरे संक्रमित झाले असून यातील १५२० जनावरे बरे झाले आहेत. जर पशु लम्पी आजाराने बाधित असेल तर, खबरदारीचा उपाय म्हणून त्या परिसरात ५ किलोमीटरमधील जनावरांचे लसीकरण गरजेचे आहे. राज्यात १६ लाखांहून अधिक लसी उपलब्ध आहेत, तर अतिरिक्त ५ लाख लसी प्राप्त होणार आहेत. पुढील आठवड्यात ५० लाख लसी उपलब्ध होतील अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies