Type Here to Get Search Results !

आईला मारहाण केल्याचा जाब विचारला असता वडिलांनीच केली मुलाची हत्या!



गोंदिया : जिल्ह्यातील गोरेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या पिंडकेपार या गावातील वडिलाने आपल्या मुलाला चाकूने वार करत खुन केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी वडिलाला गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, पिंडकेपार येथील आरोपी वडील लोकचंद बुरले (वय 65) आपल्या राहत्या घरी पत्नी व मुलासोबत वास्तुव्यास आहेत. पत्नीसोबत ते नेहमी भांडण करत मारहाण करत होते. त्यानुसार भांडण होवून मारहाण केली. याबाबत मृतक मुलगा कुलपत बुरले (वय 40) यांनी वडिलांना जाब विचारत आईला का मारहाण करत असल्याचे विचारले. यामुळे मुलगा व वडील यांच्यात वाद झाला. जाब विचारल्या्चा राग आल्याने आरोपीने आपल्या खिशात ठेवलेल्या चाकूने मृतक कुलपत याच्या पोटावर वार करत त्याची हत्या केली. 



दरम्यान,सदर प्रकरणाची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांना पोलिसांनी आरोपी लोकचंद बुरलेला अटक केली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies