Type Here to Get Search Results !

प्रेमाला घरच्यांनी विरोध केल्यामुळे प्रेमी युगुलाने उचलले टोकाचे पाऊल!

 


नागपूर: नागपूरमधील रामटेक येथे एका प्रेमी युगुलाच्या प्रेम प्रकरणाला घरच्यांनी विरोध केल्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि,   नागपूर जिल्ह्याच्या रामटेक येथील एका प्रेमी युगुलांच्या प्रेमाला कुटुंबियांनी विरोध करत त्यांच्या लग्नाला नकार दिला होता. कुटुंबियांना या दोघांचे प्रेमप्रकरण मान्य नसल्यामुळे या प्रेमी युगुलाने विष प्राषण करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अश्विनी उईके आणि अरुण कोडवते अशी या प्रेमी युगुलाची नावे आहेत. या दोघांनी विष प्राषण केल्यानंतर अश्विनीचा मृत्यू झाला आहे. तर प्रियकर अरुण मृत्युशी लढत आहे.



दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies