Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, रविवार १८ सप्टेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष :

उत्पन्नात वाढ होईल. ठरवलेले विचार अचानक बदलू नका. वरिष्ठ अधिकार्यांचे सहकार्य लाभेल. परदेश कंपनी कडून लाभाचे योग. माहीत नसलेल्या कामात लक्ष घालू नका.


वृषभ:

आरोग्यात सुधारणा दिसून येईल. शेजार्यां८ची मदत घेता येईल. धन वृद्धीचे योग जुळून येतील. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. हातातील कामाला यश लाभेल.


मिथुन:

मनोबल वाढीस लागेल. कौटुंबिक वातावरण जपावे.  वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ शक्य. मुलांची एखादी कृती त्रस्त करू शकते. नवीन कामात हात घालू शकता.


कर्क:

ज्येष्ठ व्यक्तींचे अमूल्य सहकार्य लाभेल.  आजचा दिवस लाभदायक. काटकसरीपणाचा फायदा होईल. कार्य शक्तीचे कौतुक केले जाईल. दुसर्याच्या स्वभावातील दोष दर्शवू नका. 


सिंह:

सारासार विचार लाभदायक ठरेल. तुमच्या बोलण्याचा समोरच्यावर प्रभाव पडू शकेल. इतरांना सल्ला देण्याचे काम उत्तम करू शकाल. नेहमीसारखी आनंदी वृत्ती जागृत ठेवा. तुमच्या ज्ञानाच्या अनुभवाचे कौतुक केले जाईल. 


कन्या:

धन संचयात वाढ होण्याची शक्यता. बचतीच्या योजना आखाल. मागे हटू नका. लपवाछपवीच्या गोष्टी करू नका. आजूबाजूचे धूर्त लोक ओळखून रहा.


तूळ:

कामात सुलभता जाणवेल.  तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. गोड बोलून कार्यभाग साधावा. प्रलंबित योजना मार्गी लावाल. स्वत:च्या मतावर ठाम रहा.


वृश्चिक:

मोठे काम करताना सावधानता बाळगावी.  आग्रहाला बळी पडू नका. वस्तु खरेदी करताना चोखंदळ रहा. अन्यथा नुकसान संभवते. तीव्र इच्छा जागृत ठेवावी.


धनू:

दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.  क्षुल्लक गोष्टीने खट्टू होऊ नका. कौटुंबिक प्रश्न प्राधान्याने सोडवा.  विद्यार्थ्यांना उत्तम काळ राहील. संमिश्र घटनांचा दिवस. 


मकर:

जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल.  कामाच्या स्वरुपात काहीसा बदल संभवतो. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. योग्य संधीची वाट पाहावी. 


कुंभ:

नेतृत्व गुण वाढीस लावा. चुकीच्या विचारणा प्रयत्नपूर्वक दूर सारा. आर्थिक गोष्टींकडे कटाक्षपणे लक्ष द्या. विवाह इच्छुक असलेल्यांना शुभ वार्ता मिळेल. मनातील विचार बोलून दाखवा.


मीन:

मुलांना नवीन संधि लाभू शकते. महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या संपर्कात याल. इतरांचे प्रेम संपादन करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies