Type Here to Get Search Results !

गृहमंत्री अमित शाह यांनी कुटुंबियांसह घेतले बाप्पाचे दर्शन!



मुंबई: देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी आज, सोमवारी सकाळी ११:१५ वाजता लालगबागचा राजा गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सोनल शाह आणि त्यांचे पुत्र जय शाह यांनीदेखील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. तसेच, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील अमित शाह यांच्या भेटीसाठी आले होते, त्यांनीही बाप्पाचे दर्शन घेतले. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा मुंबई दौरा महत्वाचा मानला जात आहे.



गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार हेदेखील उपस्थित होते. 



दरम्यान, लालबागचा राजा गणपतीचे दर्शन घेण्यापूर्वी अमित शाह हे भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांना भेटले. तसेच दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनीही अमित शाह यांची भेट घेतली. मात्र रोहित शेट्टींच्या भेटीमागचे कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies