Type Here to Get Search Results !

आटपाडी: तळेवाडी गावात एकाच दिवशी बाप लेकाचे निधन!



प्रियंका पडळकर/ तळेवाडी: काल २९ सप्टेंबर रोजी तळेवाडी गावात मनाला भेदावणारी घटना घडली आहे. गावातील बापलेकाचा एकाच दिवशी आजारी असल्याने मृत्यू झाला. यामुळे गावात शोककळा पसरली आहे. बाबासो दादू म्हारगुडे (वडील वय 60) आणि तानाजी बाबासो म्हारगुडे(38) असे मृत बाप-लेकाचे नाव आहे.



माहितीनुसार, वडील आणि मुलगा हे दोघेही तळेवाडी परिसरात वास्तवास होते. काल गुरुवार (२९ सप्टेंबर) रोजी बाबासो म्हारगुडे रोजच्याप्रमाणे शेतात शेळ्या घेऊन गेले असता, मात्र, झोपाल्याठीकानी काल ४ च्या सुमारास त्यांचे अकस्मात निधन झाले. 



याशिवाय, त्यांचा मुलगा तानाजी याला ३ दिवसांपूर्वी आजारी असल्याने सांगली येथे रुग्णालयात दाखल केले होते, परंतु त्यांचाही  काल ७ च्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.



दरम्यान, या घटनेने तळेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.तसेच गावातील सर्वांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies