Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री शिंदेंना धक्का; ‘या’ नेत्याने शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत पुन्हा काँग्रेसमध्ये केला प्रवेश!



कोल्हापूर - शिंदे गटाच्या बंडाळीनंतर राज्यात नवीन सरकार स्थापन झाले. सत्तेत आल्यानंतर शिंदे गटाकडे येणाऱ्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची संख्या सतत वाढत होती. मात्र आता शिंदे गटाला कोल्हापुरात पहिला धक्का बसला आहे. कोल्हापूरचे माजी उपमहापौर दिगंबर फराकटे यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.



दरम्यान, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये 15 दिवसांपूर्वी दिगंबर फराकटे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. अवघ्या 15 दिवसांमध्येच फराकटे हे शिंदे गटातून स्वगृही परतले आहेत. या प्रकरणामुळे राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies