Type Here to Get Search Results !

काळजी घ्या! कोरोनामुळे जगात दर ४४ सेकंदात होतोय एकाचा मृत्यू: जागतिक आरोग्य संघटना!



नवी दिल्ली: देशासह जगभरात कोरोना आटोक्यात येत असला तरी कोरोना साथीबाबत एक माहिती समोर आली आहे. जगात कोविड -१९ संसर्गामुळे दर ४४ सेकंदाला एका रुग्णाचा मृत्यू होत असल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने  सादर केला आहे. म्हणजेच कोरोनाची लागण होऊन जगात दर ४४ सेकंदाला कुठे ना कुठे एक मृत्यू होतोय. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांनी ही माहीती समोर आणली आहे.



डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयसस म्हणाले की, "हा विषाणू असाच संपणार नाही. जागतिकपणे नोंदवलेल्या प्रकरणामध्ये आणि मृत्यूंमध्ये घट होत आहे. हे खूप उत्साहवर्धक आहे पण, हा ट्रेंड कायम राहील याची शाश्वती नाही. फेब्रुवारीपासून साप्ताहिक मृत्यूची संख्या ८० टक्क्यांहून अधिक घसरली आहे, परंतु तरीही गेल्या आठवड्यात कोविड-19 मुळे दर ४४ सेकंदांना एक व्यक्ती मरण पावली आहे" अशी माहीती डॉ. घेब्रेयसस यांनी दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies