मुंबई- टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरने आपल्या प्रतिभेच्या जोरावर कलाविश्वात नाव कमावले. मात्र तिने आजवर लग्न का केलं नाही, अशा प्रश्न वारंवार चाहते उपस्थित करतात. आता पहिल्यांदाच तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यासोबतचा फोटो पोस्ट करत प्रेमाची जाहीर कबुली दिली. या अभिनेत्याशी एकताला लग्न करायचे होते. त्याच्या वाढदिवसानिमित्त एकताने ही खास पोस्ट लिहिली आहे
एकता कपूरने ज्या अभिनेत्याबद्दल प्रेमाची जाहीर कबुली दिली, तो चंकी पांडे आहे. चंकी पांडेच्या वाढदिवसानिमित्त एकताने हा फोटो पोस्ट केला आहे. चंकी पांडेसोबत लग्न करायचं होतं, मात्र ते शक्य होऊ शकलं नाही, असेही तिने लिहिले आहे.