Type Here to Get Search Results !

......म्हणून रिकव्हरी एजंटने गर्भवतीला ट्रॅक्टरखाली चिरडले; गर्भवती महिलेचा मृत्यू!



रांची : झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात गुरुवारी इचक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटने एका गर्भवती महिलेला ट्रॅक्टरखाली चिरडले. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. कर्जाचा हप्ता भरायला उशिर केल्याच्या किरकोळ कारणावरून रिकव्हरी एजंटने हा अतिरेक केला आहे. 



माहितीनुसार, मृत महिला ही एका दिव्यांग शेतकऱ्याची मुलगी असून ती तीन महिन्यांची गर्भवती होती. फायनान्स कंपनीचे अधिकारी तिला न सांगता तिच्या घरी आले. यावेळी गर्भवती महिला ट्रॅक्टरसमोर उभी होती. त्यावेळी फायनान्स कंपनीचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यात बाचाबाची झाली. या वादानंतर एजंटने शेतकऱ्याच्या गर्भवती मुलीला ट्रॅक्टरखाली चिरडले.  तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.



दरम्यान, या प्रकरणात रिकव्हरी एजंट आणि खाजगी फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकासह चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies