Type Here to Get Search Results !

रिक्षा-टॅक्सी प्रवासात भाडेवाढ; मंत्रालयात बैठक पार!




मुंबई : सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असतानाही भाडेवाढ मिळत नसल्याने मुंबई रिक्षा-टॅक्सी संघटनांनी सोमवार, २६ सप्टेंबरपासून रिक्षा-टॅक्सी संपाची हाक दिली होती. याच पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज टॅक्सी रिक्षा चालक संघटनेसोबत मंत्रालयात बैठक घेतली.

 

दरम्यान, रिक्षा-टॅक्सी संघटनांच्या मागणीनुसार मुंबईत रिक्षाच्या 2 रुपयाने तर टॅक्सीच्या प्रवासासाठी 3 रुपयांची भाडेवाढ करण्यात आली असून त्यानुसार रिक्षा 24 आणि टॅक्सी 30 रुपये भाड्याला मंजुरी देण्यात आली आहे. हे नवे दर 1 ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहेत त्यामुळे रिक्षा-टॅक्सी संघटनांच्या मागण्या मान्य झाल्या असल्या तरी सर्वसामान्याच्या खिशाला कात्री लागणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies