Type Here to Get Search Results !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिंदे गटातील मंत्र्यांना तंबी!



मुंबई: शिंदे गटातील मंत्र्यांवर देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत प्रसिद्धिसाठी परस्पर नवनव्या घोषणा करणाऱ्या मंत्र्याना देवेंद्र फडणवीस यांनी तंबी दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, शिवसेना आणि शिंदे गटात सुरू असलेल्या वादावरही नाराजी व्यक्त केली असल्याचे बोलले जात आहे.तसेच, शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर ४२ दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मंत्रिपद मिळल्यानंतर काही मंत्र्यांनी प्रसिद्धीसाठी घोषणांचा सपाटाच लावला आहे.



दरम्यान, काल मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मंत्र्यांनी केलेल्या घोषणांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी उतावळ्या मंत्र्यांची चांगलीच शाळा घेतल्याचे सांगितले जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies