Type Here to Get Search Results !

ठाकरेंनी राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी दिलेली यादी शिंदे सरकारने घेतली मागे!



मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का दिला आहे. ठाकरे सरकारच्या काळात राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी दिलेली यादी शिंदे सरकारने मागे घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ही यादी मागे घेत असल्याचे पत्र दिले आहे.  



दरम्यान, 12 नोव्हेंबर 2020 मध्ये ठाकरे सरकारने 12 नावांची यादी राज्यपालांकडे दिली होती. मात्र राज्यपालांनी त्यावर कोणताही निर्णय घेतला नव्हता. यावरून महाविकास आघाडी आणि राज्यपालांमध्ये वादही समोर आले होते. मात्र दरम्यानच्या काळात सरकार बदलल्यानंतर आता ही यादीच मागे घेण्याचे पत्र शिंदे सरकारने दिले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies