Type Here to Get Search Results !

दसरा मेळावा परवानगी नाट्यात नवा ट्विस्ट; कोणाचा होणार शिवाजी पार्क वर दसरा मेळावा?




मुंबई : शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्क वर दसरा मेळावा मिळण्यावरुन उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान, दसरा मेळावा परवानगी नाट्यात आता राज्याच्या दोन महत्वाच्या विभागांची एन्ट्री होण्याची शक्यता आहे.



मुंबई पोलिस आणि गृहविभाग शिवाजी पार्क वर दसरा मेळावा घेण्याबाबत आपली भूमिका मांडणार आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाला परवानगी न देण्याच्या हालचाली दोन्ही विभागांकडून सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.



दरम्यान, कुणालाच परवानगी ने देण्याची सूचना मुंबई पोलीस आणि गृहविभाग मुंबई पालिकेला करणार असल्याचे समोर येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies