Type Here to Get Search Results !

“जोपर्यंत तुम्ही हिंदू होत नाही, तोपर्यंत तुम्ही अस्पृश्य आहात”: ‘यांचे’ वादग्रस्त वक्तव्य!मुंबई : जोपर्यंत तुम्ही हिंदू होत नाही, तोपर्यंत तुम्ही अस्पृश्य आहात, असे वादग्रस्त विधान एका खासदार  ए राजा यांनी केले आहे. ते तामिळनाडूतील द्रमुक पक्षाचे नेते आहेत. त्यांचा व्हिडीओ तामिळनाडूतील भाजपच्या अध्यक्षांनी ट्वीटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. ए राजा यांनी द्वेष पसरवणारे विधान केल्यावरुन सर्वच स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.दरम्यान, ए राजा यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपने संताप व्यक्त केला आहे. ए राजा यांनी केलेलं विधान खेदजनक आहे, असं म्हणत के अन्नामलाई यांनी ट्वीट केले आहे. के अन्नामलाई हे तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष आहेत. एका ट्वीटमध्ये के अन्नामलाई यांनी खासदार ए राजा यांचा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी नेमक्या विधानाचा पुरावा दिला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies