मुंबई - देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. , काल अनंत अंबानी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना एचएन रिलायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
दरम्यान, अनंत अंबानी यांना सध्या एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तसेच, महत्वाचे म्हणजे कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंबानी यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेले होते.