Type Here to Get Search Results !

शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्याबाबत शिंदे गट उद्धव ठाकरेंना देणार मोठा धक्का?



मुंबई : शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्याबाबत शिंदे गट आक्रमक होण्याची शक्यता आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्कवर कुणालाही परवानगी देऊ नका, अशी मागणी शिंदे गट करणार असल्याची माहिती आहे. 



शिवाजी पार्क मैदानावर दरवर्षी शिवसेनेकडून दसरा मेळावा घेण्यात येतो. या मेळाव्याला राज्यभरातून हजारो शिवसैनिक येत असतात. यावर्षी सुद्धा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेकडून अर्ज करण्यात आला आहे. तसेच, शिंदे गटाकडून सुद्धा दसरा मेळाव्यासाठी अर्ज करण्यात आला आहे.


दरम्यान, शिवसेनेला परवानगी मिळाल्यानंतर शिंदे गट आक्रमक भूमिका घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्क कोणालाच देऊ नका ही आक्रमक भूमिका शिंदे गट घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवाजी पार्क मैदान फ्रिज होण्याची शक्यता आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies