Type Here to Get Search Results !

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर ईडीच्या कार्यालयाचा लागला बोर्ड? राजकीय वर्तुळात चर्चा!मुंबई: राज्यासह देशभरात अनेक राजकीय नेते, उद्योगपती तसेच बॉलिवूड अभिनेते ईडीच्या रडावर आहे. त्यातच आता मुंबई येथील मंत्रालयात सहाव्या मजल्यावर ED X असे बोर्ड लावण्यात आले आहेत. त्यामुळे मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर ईडीचे कार्यालय असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 


दरम्यान, राज्यात ईडीचे सरकार आलंय पण, E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र असा टोला देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना लगावला होता. दरम्यान, आता मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर E आणि D नावाचे बोर्ड लावण्यात आले आहे. त्यामुळे हे केंद्रीय तपास यंत्रणा ईडीचे कार्यालय आहे की शिंदे आणि फडणवीस यांचा नावाने लावलेले बोर्ड आहे? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies