नवी दिल्लीः शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या फायद्यासाठीही पंतप्रधान किसान योजना शेतकऱ्यांसाठी अंमलात आणली गेली आहे. या योजनेअंतर्गत भारतातील शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2-2 दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात. त्यामुळे दरवर्षी 6 हजार रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो. देशातील अनेक शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेचा फायदा 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना झाला असून केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 हप्ते पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवर बदल करण्यात आल्यानंतर शेतकरी आता 12 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
दरम्यान, सप्टेंबर महिन्यात कोणत्याही दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांची रक्कम जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.