Type Here to Get Search Results !

“श्रीलंकेतील नेते पळून गेले तसे पवारांनाही...”: गोपीचंद पडळकर यांचा पवारावर हल्लाबोल!



बारामती:  भाजपच्या 'मिशन बारामती' निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या मेळाव्यात पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. 



यावेळी पडळकर म्हणाले की, एखाद्याला फसवून घ्यायचे, लुबाडून घेण्यात बारामतीकारांना फार आनंद असतो. जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा सुप्रिया सुळे या वरमाई सारख्या फिरत होत्या.  निर्मला सीतारामन या बिनटाक्याचे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आहेत. बारामती लोकसभेचे कधी ऑपरेशन होईल हे पवारांना कळणार देखील नाही , असे वक्तव्य पडळकर यांनी केले.



तसेच, 2024 ला पवारांचे विसर्जन करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे बारामतीत आले आहेत. श्रीलंकेतील नेते पळून गेले तसे शरद पवारांना पळून जावं लागणार असल्याचा हल्लाबोल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies