Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, बुधवार २१ सप्टेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!
मेष:

सहकार्‍यांशी मतभेदाची शक्यता. योजना यशस्वी झाल्याचा आनंद मिळेल. लांबणीवर पडलेली कामे पूर्ण होतील. प्रवासातून लाभ संभवतो. आळस झटकून कामाला लागा.वृषभ:

गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आर्थिक योजना पूर्ण होतील. दिवस मध्यम फलदायी राहील. मिथुन:

चांगल्या कामाचे पुण्य पदरात पडेल. फसवणुकीपासून सावध रहा. दिवसभर कामाची धांदल राहील.धरसोड वृत्ती कमी करावी. एखादी घटना मन खिन्न करू शकते.


 

कर्क:

जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. दिवसाचा बहुतांश वेळ मजेत जाईल. थकवा दूर होईल. ग्रहांची अनुकूल स्थिती लाभदायक ठरेल. हातातील कामे विनासायास पूर्ण होतील. सिंह:

नियोजित कामे पूर्णत्वास जातील. साधे आणि सरळ जीवन मार्गक्रमीत कराल. सतत आशावादी राहावे. महत्त्वाच्या कामाच्या नोंदी तपासून पहाव्यात. संमिश्र घटनांचा दिवस. कन्या:

जुन्या मित्रांच्या भेटीचा योग येईल. दुसर्‍यांच्या उपयोगी याल. दूरच्या नातेवाईकांची खुशाली समजेल.  लोक तुमचा सल्ला विचारात घेतील. मुलांकडून शुभ वार्ता मिळेल. तूळ:

झोपेची तक्रार जाणवेल.  तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल. नातेवाईकांमध्ये सलोखा जपावा. आत्मविश्वास वाढीस लागेल. लोक तुमच्याकडे प्रभावित होतील. वृश्चिक:

कामाच्या बाबतीत सतर्क राहावे. संयमी भूमिका घ्यावी. मुलांसोबत दंगामस्ती कराल. करमणुकीत अधिक वेळ घालवाल. उगाच चिडचिड करू नये.धनू:

एखादा चांगला अनुभव गाठीशी बांधाल. सरकारी कामे अधिक वेळ खातील. नवीन मित्र जोडले जातील. तरुणांच्यात सामील व्हाल. आज ग्रहमानाची अनुकूलता लाभेल.मकर:

कामाचे नवीन धोरण ठरवावे. जुन्या गोष्टींची खिन्नता बाळगू नका. काटकसरीपणा अंगी बाळगावा. जवळचा प्रवास कराल. कौटुंबिक मतभेद टाळावेत. कुंभ:

भागिदारीतून लाभ मिळेल. आवडी-निवडी बाबत दक्ष राहाल. मनाची चंचलता जाणवेल. जोडीदाराचा हट्ट पुरा कराल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. मीन:

आजचा दिवस उत्तम फलदायी राहील.  दिवस मनाप्रमाणे घालवाल. गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडून येतील.आवडत्या गोष्टी करण्याकडे कल राहील. बोलतांना शब्दांचे वजन लक्षात घ्या. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies