Type Here to Get Search Results !

‘यांची’ सेना आहे, त्यामुळे ज्याची शिवसेना त्याचाच दसरा मेळावा” : बच्चू कडू!




पुणे : शिवसेना आणि शिंदे गटाचा वाद सुप्रीम कोर्टात सुरू आहे. आज कोर्टात धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची मागणी शिंदे गटाकडून केली जात आहे. 



यावर धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर अधिक संभ्रम निर्माण होईल, असे बच्चू कडू यांनी वक्तव्य केले. तसेच, ज्याची शिवसेना त्याचा दसरा मेळावा, असेही ते म्हणाले. एकनाथ शिंदे साहेबांची सेना आहे. म्हणून एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा होणार आहे, असे बच्चू कडू यांनी सांगितले आहे.


दरम्यान, सुप्रीम कोर्टात निकाल शिंदे गटाच्या बाजूनेच लागणार, असा विश्वास आमदार आणि शिंदे गटाचे नेते बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. ते पुण्यात बोलत होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies