Type Here to Get Search Results !

धक्कादायक! दर्ग्याच्या आवारातच केली दोघांची हत्या!



अमरावती : अमरावती जिल्ह्यात बडनेरा येथील दडबडशहा दर्गा परिसरात झोपलेल्या दोघांचा धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, लोणी रोडवरील दडबडशहा दर्ग्याच्या आवारात दोन इसम झोपले होते. दरम्यान रात्रीच्या सुमारास या दोघांचा गळा चिरून हत्या केली आहे. मुजावर अनवर (वय ५०) राहणार लाल खडी आणि तौसीफ खान (वय २५) राहणार कारंजा अशी मृतांची नावे आहेत.



दरम्यान,  घटनास्थळी लोणी व बडनेरा पोलीस दाखल झाले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies