Type Here to Get Search Results !

राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली मोठी प्रतिक्रिया!



मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली. दरम्यान, राज ठाकरे यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. ही एक सदिच्छा भेट होती, याशिवाय मला शिवतीर्थावरील गणपतीचं दर्शनही घ्यायचं होतं, असे शिंदे म्हणाले.


तसेच, यंदाचा गणेशोत्सव हा येणाऱ्या राजकीय नवीन समीकरणाची नांदी ठरणार का? असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला. यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले की, आमची राजकीय चर्चा झालीच नाही, त्यामुळे नांदी कशी ठरेल आणि समीकरणं काय? असे म्हणत त्यांनी या विषयावर बोलणं टाळले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies