मुंबई : दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट आणि शिवसेना दोन्ही गटाकडून शिवाजी पार्कची मागणी करण्यात आली होती. मात्र अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही.अशातच आता बीकेसीतील मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. तसेच, दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा अर्ज महापालिकेने स्विकारल्याची माहिती समोर येत आहे.
माहितीनुसार, शिवसेनेच्या वतीने देखील दसरा मेळाव्यासाठी बीकेसीतील मैदानाची मागणी करण्यात आली होती. मात्र महापालिकेकडून शिवसेनेचा अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे