Type Here to Get Search Results !

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड जिंकणाऱ्या कोल्हापूरच्या धावपटूचा मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान मृत्यू!




सातारा : गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड जिंकणाऱ्या धावपटूचा मॅरेथॉन स्पर्धा सुरु असतानाच मृत्यू झाला आहे. मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान तो शर्यत जिंकणारच होता पण त्या आधीच त्याला मृत्यूने गाठले. राज क्रांतीलाल पटेल असे मृत धावपटूचे नाव आहे. 



माहितीनुसार, सातारा जिल्ह्यात हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात राज सहभागी झाला होता. राज हा कोल्हापूरमधील राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू होता. राज याने गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव पटकावले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत सात हजारांहून अधिक धावपटू सहभागी झाले होते. मॅरेथॉन स्पर्धेत राज धावत असताना अचानक भोवळ येऊन तो जमीनीवर कोसळा. त्यांच्यासोबत धावत असलेल्या धावपटुंनी उचलून त्याला बाजूला घेतला. यानंतर तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.


दरम्यान,  राजचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पटेल याच्यासह तीन धावपटूही जखमी झाले आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies