Type Here to Get Search Results !

कॉंग्रेसमधील ‘या’ महिला पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे गटात केला प्रवेश!



करमाळा:  करमाळ्यातील शिवसेना नेत्या रश्मी बागल आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यामध्ये रविवारी पुण्यात बैठक झाली होती. या बैठकीनंतर रश्मी बागल या शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. दरम्यान बागल यांनी सध्या कोणतीच भूमिका जाहीर केली नाही. परंतु पंढरपुरातील कॉग्रेस महिला पदाधिकाऱ्यांनी मंत्री सावंत यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला.


दरम्यान आरोग्य मंत्री तानाजी सावंत, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांच्या उपस्थितीत मुबिना मुलाणी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुबीना मुलाणी यांच्या प्रवेशामुळे पंढरपूर विभागात काॅंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies